Home › News & Media › विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
School News

विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

📍 Latur, Maharashtra · 📅 02 October 2026
लातूर : विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल, लातूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा, स्वच्छता व साधेपणाचे विचार तसेच लालबहादूर शास्त्रीजींचे देशसेवा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य श्री. बसवेश्वर धाराशिवे, कॅम्पस डायरेक्टर प्रा. किशोर जेवे, प्राचार्य श्री. संगमेश्वर धाराशिवे तसेच श्री. अक्षय मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती देत त्यांच्या आदर्शांचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
← Back to News